सुदृढ संपन्न राष्ट्राच्या दृष्टीने समाजातील प्रत्येकाला विकासाची समान संधी प्राप्त होवो व सर्वजण स्वस्थ, सुशिक्षित, सुसंस्कारीत, समर्थ व सुरक्षीत समाजाचे अविभाज्य अंग बनो यादृष्टीने नर सेवा हीच नारायण सेवा समजून आपल्या जवळील धन, समय, ज्ञान, श्रम, पदाचा उपयोग लोकहितासाठी समर्पित करणे हाच राष्ट्रधर्म होय.
डॉ. केशव बलिराम हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या सेवा, राष्ट्रीय विचार आणि समाजभक्तीच्या आदर्शांवर आधारित ही समिती स्थापन करण्यात आली. समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत सेवा, शिक्षण, संस्कार आणि जागरूकता पोहोचवणे हे आमचे प्रमुख ध्येय आह
सेवा कार्यात सहभागी व्हासमग्र राष्ट्रनिर्मितीसाठी चार स्तंभ
डॉ. केशव बलिराम हेडगेवार यांनी मांडलेल्या समग्र राष्ट्रनिर्मितीच्या विचारात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिक्षण केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नसून, चारित्र्यवान, राष्ट्रभक्त, सेवाभावी आणि संस्कारक्षम नागरिक घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे.
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य ही मूलभूत गरज आहे. ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागांमध्ये आरोग्य सुविधा अपुऱ्या असून, गरिबी, अज्ञान व असुविधांमुळे अनेक आजार गंभीर स्वरूप धारण करतात.
समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आर्थिक स्वावलंबन हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. कौशल्य, आत्मविश्वास व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हेच खरे समाजपरिवर्तनाचे साधन ठरते.
समाजातील प्रत्येक घटकाचा समतोल विकास घडवून आणण्यासाठी सामाजिक समरसता, संवेदनशीलता व सहभाग अत्यंत आवश्यक आहे. गरिबी, अज्ञान, व्यसन यांसारख्या समस्यांमुळे समाजातील मोठा वर्ग वंचित राहतो.
आपण अशाप्रकारे या सेवाकार्यात सहभागी होऊ शकता
आपला वेळ देऊन सेवेचा भाग व्हा
आपल्या देणगीने उपक्रम सक्षम करा
एका विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जबाबदारी
संस्कार वर्गाचा वार्षिक खर्च स्वीकारा
ज्ञानदानाचा उत्तम मार्ग
आनंदाच्या प्रसंगी समाजहितासाठी योगदान
प्रियजनांच्या स्मरणार्थ शाश्वत योगदान
आपल्या देणगीवर आयकर कलम 80G अंतर्गत सवलत
आपला सहभाग, वेळ, संसाधने यामुळे आमचे हे उपक्रम अधिक सशक्त होतील
सेवा कार्यात सहभागी व्हा